शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी ते जितेंद्र नारायण त्यागी.....
शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यानी केले धर्मपरिवर्तन, केला हिंदू धर्माचा स्वीकार
गाझियाबादच्या डासना देवी मंदिरातील शिव शक्ती धामचे महंत यती नरसिम्हानंद गिरी महाराज यांनी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम यांना सनातन धर्मात सामिल करून घेतले.
रिझवी याचे नवीन नाव जितेंद्र नारायण त्यागी ?
वसीम रिझवी यांचे अद्याप नामांतर झालेले नाही. यती नरसिम्हानंद गिरी महाराज यांनी धार्मिक अनुष्ठाण करून त्यांना हिंदू धर्मात सामिल करून घेतले. रिझवी यांना त्यागी समुदायाशी जोडण्यात आले आहे. यानंतर जितेंद्र नारायण त्यागी असे नवीन नाव देण्यात आले आहे.
यावेळी ते म्हणाले “मृत्यू झाल्यानंतर माझा दफनविधी करू नका, तर हिंदू पद्धतीने अंत्यविधी करा. ” इस्लामचे पवित्र धर्मग्रंथ कुराणमध्ये बदल करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. तेव्हापासूनच मुस्लिम समुदायात ते टीकेचे केंद्र ठरत आहेत.