जागतिक मृदा दिनाचे काय आहे महत्त्व ? कश्याप्रकारे आपण मातीचे संवरक्षण करू शकतो ?











जागतिक मृदा दिनाचे महत्त्व
 

माती हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. या मातीच्या संवर्धनाची असलेली गरज लक्षात घेऊन लोकानी जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर 'जागतिक मृदा दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षततेसाठी मृदेचं संवर्धन अत्यंत महत्तवाचे आहे. वाढती लोकसंख्या आणि जागीतिकरणाची स्पर्धा यामुळे भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्षांचा कालावधी लागतो.

मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश त्यामागं आहे.

भारतातही मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी भारत सरकारतर्फे 2015 साली सॉइल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे.

मृदा प्रदूषण टाळायचं असेल तर काय करावं?
अलिकडे मोठ्या प्रमाणावर मृदेचं प्रदूषण होताना दिसतंय. ते टाळायचं असेल तर काही पाऊलं उचलली पाहिजेत. प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे. त्या ठिकाणी पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करायला हवा.आपल्या वाया जाणाऱ्या खाद्य पदार्थांचं रुपांतर कंपोस्ट खतात करायला हवं.

Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Powered By Blogger
Powered By Blogger

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget