वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे काय? शेतीत त्याचा काय फायदा?
वनस्पती ऊती संवर्धन
वनस्पति आणि प्राण्याचे शरीर हे लाखों पेशीपासून बनलेले असते याची संरचना ही त्याचा कार्य करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणार्या पेशीसमूहाला ऊती म्हणतात. या वनस्पतीच्या काही ऊतीमध्ये पूर्ण वनस्पति तयार करण्याचे तंत्र असते याच ऊतीचे प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणामध्ये संवर्धन केले जाते आणि यापासून हजारो एकाच प्रकारचे वनस्पति तयार केले जाते.

ऊती संवर्धनाचे फायदे:
- या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत एकाच प्रकारच्या हजारो रोपाचे उत्पादन केले जाते.
- ऊती संवर्धीत रोपे रोग मुक्त असतात. या तंत्रज्ञानाद्वारे रोग प्रतिरोधी, कीटक प्रतिरोधी आणि दुष्काळ प्रतिरोधी वाणाचे उत्पादन केले जाऊ शकते
- संपूर्ण वर्षभर याचे उत्पादन केले जाऊ शकते, याच्यावर ऋतूचा काही परिणाम होत नाही.
- या तंत्रज्ञानापासून तयार रोपाची वाढ चांगली व लवकर होते. फलधारणा लवकर व एकदाच होते.
- हे तंत्रज्ञान विषाणूमुक्त वाण तयार करण्यास खूप मदत करते.

Post a Comment